मुंबई : ‘तिसरं जागतिक युद्ध गायीवरून होईल’ असं वक्तव्य महामंडलेश्वर स्वामी अखिलेश्वरानंद गिरी यांनी केलं आहे. सध्या देशभरात गोरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. दलित आणि मुस्लिमांवर हल्ले वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर गिरी यांनी हे वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महामंडलेश्वर स्वामी अखिलेश्वरानंद गिरी हे मध्य प्रदेश सरकारच्या गोपालन व पशुधन संवर्धन मंडळाचे अध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र भाजप सरकारचेच पदाधिकारी असणाऱ्या गिरी यांनी गोरक्षकांचे समर्थन केले आहे.


“गाडीत कोंबलेली मृत गाय पाहून गोरक्षकांना राग येणं स्वाभाविक आहे.  त्यांच्यासाठी ही भावनिक बाब आहे. मात्र गोरक्षकांनी कायदा हातात घेऊ नये. पोलिसांची वाट पाहावी” असं गिरी यांनी म्हटलंय. गायींबाबतचा वाद हा खूप जुना आहे. 1857 साली झालेली लढाईसुद्धा याच कारणाने झाली होती. त्यामुळे तिसऱ्या जागतिक युद्धासाठीही हीच गोष्ट कारणीभूत ठरेल असं त्यांना वाटतंय.