मोहाली : भारताच्या एका कन्येला सर्च इंजिन गूगलनं तब्बल ४० लाखांचं पॅकेज ऑफर केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वान्या जुहाल असं या तरुणीचं नाव आहे. वान्याची निवड गूगलच्या सिडनीच्या ऑफिससाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून झालीय.


मोहालीमध्ये सेक्टर ६९ मधील शेमरॉक सीनियर सेकंडरी शाळेत वान्याचं प्राथमिक शिक्षण झालंय. त्यानंतर तिनं २०१६ मध्ये आयआयटी हैदराबादहून प्रोफेशनल डिग्री मिळवली. 


आयआयटीमध्ये शिकत असतानाच गूगलनं वान्याची निवड प्लेसमेंट दरम्यान केली होती. आज ४० लाखांचं पॅकेज घेताना आपण खूप आनंदात असल्याचं वान्यानं म्हटलंय. 


वान्या हिची आई एक पत्रकार आहे तर तिचे वडील सेनेत कर्नल पदावर कार्यरत आहेत.