या हॉटेलात मिळते फुकट जेवण
हिमाचल प्रदेशातील एक हॉटेल सध्या चांगलेच चर्चेत आहे. या हॉटेलचे नाव आहे गोपाळ हॉटेल आणि रेस्टोरंट. येथे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाल प्रत्येक गोष्टीवर 50 टक्क्यांर्यंत सूट दिली होती. इतकंच नव्हे तर शहीद जवानांच्या कुटुंबासाठी येथे सर्वकाही फ्री आहे. केवळ खाणेच नव्हे तर या हॉटेलात राहणेही फ्री आहे.
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील एक हॉटेल सध्या चांगलेच चर्चेत आहे. या हॉटेलचे नाव आहे गोपाळ हॉटेल आणि रेस्टोरंट. येथे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाल प्रत्येक गोष्टीवर 50 टक्क्यांर्यंत सूट दिली होती. इतकंच नव्हे तर शहीद जवानांच्या कुटुंबासाठी येथे सर्वकाही फ्री आहे. केवळ खाणेच नव्हे तर या हॉटेलात राहणेही फ्री आहे.
प्रसिद्धीच्या कारणासाठी हॉटेल या ऑफर देत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र असे नाहीये. जवानांप्रती असलेला आदर व्यक्त करण्याची ही आपली पद्धत असल्याचे या हॉटेल मालकाचे म्हणणे आहे.
दरम्यान, या हॉटेलात सूट मिळवण्यासाठी जवानांनी गणवेशात असणे महत्त्वाचे आहे. विनागणवेश घातलेल्या जवानांना खाण्याच्या बिलावर 25 टक्के सूट दिली जाते. गणवेश परिधान करुन आलेल्या जवानांना खाण्याच्या बिलावर 50 टक्के सूट दिली जाते.