नवी दिल्ली : एका धक्कादायक प्रकारात दिल्लीत एका १८ वर्षीय मुलाला काही समाजकंटकांनी अमानुष मारझोड केल्याची घटना घडली आहे. वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांनुसार एका बागेत फिरणाऱ्या दिलकाश, अजमलआ आणि नईम या तीन मित्रांनी 'भारत माता की जय' म्हणण्यास नकार दिल्याने त्यांना मारझोड केल्याची घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी आणि माझे मित्र बन्सवाला पार्कात फिरायला गेलो होतो. आमच्या मदरशापासून ३०० मीटर दूरवर असणाऱ्या या पार्कात आमच्यावर काही तरुणांनी हल्ला केला. आम्ही (इस्लामी) टोप्या घातलेल्या असल्याने त्यांनी आम्हाला 'भारत माता की जय' म्हणायला सांगितलं,' असा आरोप दिलकश याने केल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या मुलांना मारहाण करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


'आम्ही या घटनेचा वैद्यकीय कायदेशीर रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहोत. दिलकशने केलेल्या आरोपांच्या आधारावर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. त्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्याला आणि त्याच्या मित्रांना भारत माता की जय म्हणण्याची जबरदस्ती करण्यात आली होती,' असं पोलीस उपायुक्त विक्रमजीत सिंग यांनी सांगितले.


मारहाण झालेले तिघेही बिहारमधील पुर्निआ जिल्ह्यात राहणारे आहेत. २०१५ साली तिघे दिल्लीतील फैझ-उल-उलूम-घौसिया मदरशात शिकण्यासाठी आले होते.