नवी  दिल्ली : अवघ्या ७२ तासांमध्ये पॅन कार्ड बनवता येऊ शकणार आहे. अधिकाधिक नागरिकांना कराच्या व्याप्तीत आणण्याकरिता, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स म्हणजेच सीबीडीटीने हे पाऊल उचलले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे व्यावसायिकांना अवघ्या एका दिवसातच पॅन कार्ड मिळू शकणार आहे. सध्या पॅन कार्ड तयार करुन घेण्यासाठी १५ ते २०दिवसांचा अवधी लागतो. 


देशांतर्गत बाजारात काळ्या पैशांच्या व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी लवकरच एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली होती. त्यानुसार हा निर्णय घेतला गेला.


 काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करताना आता पॅन कार्ड आवश्यक आहे. तसेच आता तुम्हाला नवे पॅन कार्ड काढायचे आहे. तर ते कोणाची मदत न घेता काढता येऊ शकणार आहे. किंवा पॅनमध्ये अद्यावत माहिती असायला पाहिजे. तसेच बदल करायचा असेल तर आता ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यामुळे तुम्ही घर बसल्या हे काम करू शकणार आहात.