नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध असताना बीएसएफनं माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. भारतीय ह्द्दीत चुकून घुसलेल्या पाकिस्तानी मुलांची बीएसएफने मिठाई देऊन सुटका केली. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नारोवाल जिल्ह्यात ही घटना घडली. आमिर (वय १५), नोमिन अली (वय १४) आणि अरशद (वय १२) ही पाकिस्तानातील रिया गावातील तीन मुले आंतरराष्ट्रीय सीमेवरुन चुकून भारताच्या हद्दीत आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तिघांची व्यवस्थित चौकाशी करण्यात आली. हे तिघेही त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. भारताची हद्द कुठून सुरु होते हे न कळल्याने त्यांच्याकडून हद्द ओलांडली गेली.


हे युवक चुकून भारताच्या हद्दीत आल्याने त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती बीएसएफ जवान सीपी. मीना यांनी दिली. यावेळी भारतीय जवानांसोबतचा हा क्षण या मुलांच्या लक्षात राहावा म्हणून त्यांना चॉकलेट भेट म्हणून देण्यात आल्याचे बीएसएफ जवान सीपी. मीना यांनी सांगितले. या तिघांना हा क्षण नेहमीसाठी लक्षात राहण्यासाठी चॉकलेट भेट देण्यात आले, असेदेखील त्यांनी सांगितले.


"बीएसएफच्या जवानांनी माझा भाऊ, मित्र आणि मला जी वागणूक दिली त्याने मला आश्चर्य वाटले. हद्द पार केल्यानंतर आम्हाला अटक करण्यात आली मात्र ज्या जवानांनी आमची व्यवस्थित काळजी घेतली. त्यांनी आम्हाला व्यवस्थित जेवणही दिले. जशी या जवानांनी आमची काळजी घेतली त्याप्रमाणे आमच्या सरकारनेही भारतीयांशी चांगली वर्तणूक करावी अशी माझी अपेक्षा आहे", असे तिघांमधील एका पाकिस्तानीने सांगितले.