नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या भुवनेश्वरमधील प्रसिद्ध लिंगराज मंदिराला भेट देणार आहेत. तेथे ते लिंगराजाच्या पिंडीवर जलाभिषेक करणार आहेत. त्यानंतर तेथील सर्व ज्योतिलिंगांचे दर्शनही घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी पूजा करत असताना तेथील काही प्रमुख पुजारी श्लोकांचे पठन करणार आहेत. तसेच लिंगराज मंदिर संस्थेकडून उडिसाचा प्रसिद्ध कोराखई त्यांना भेट देण्यात येणार आहे. हा पदार्थ लाहीपासून तयार करण्यात येतो. त्यामध्ये काजू, पिस्ता आणि नारळ टाकून तो तयार करण्यात येणार आहे.


लिंगराज हा सर्व शिवलिंगांचा राजा आहे, असे मानले जाते. हे मंदिर ११ व्या शतकातील आहे. सोमवंशी राजा जजाती केशरी यांनी या मंदिराची निर्मिती केल्याचे सांगण्यात येते. या मंदिराच्या परिसरात बिंदुसागर सरोवर आहे. या सरोवराला देशातील सर्व नद्या येवून मिळतात, असे मानले जाते.