नवी दिल्ली: ट्रेनमधून केलेला प्रवास आता तुम्हाला विमानासारखा वाटू शकतो, कारण विमानामध्ये असणारी एअर हॉस्टेस आता रेल्वेमध्येही दिसणार आहे.  दिल्ली-आग्रा गतीमान एक्स्प्रेस या ताशी 160 किमीच्या वेगानं धावणाऱ्या ट्रेनमध्ये ट्रेन हॉस्टेस तुमचं स्वागत करेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 फेब्रुवारीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे बजेट सादर करतील, त्यामध्ये या ट्रेनची वैशिष्ट्य सांगणार आहेत. या ट्रेनमध्ये हाय पॉवर इमरजंसी ब्रेकिंग सिस्टिम, ऑटोमेटिक फायर आलार्म, जीपीएस सिस्टिम असणार आहे.  या ट्रेनमधून प्रवास कराताना तुम्हाला टीव्हीही बघता येणार आहे. 


या ट्रेनचं तिकीट शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा 25 टक्क्यांनी जास्त असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.  पूर्ण एसी असणाऱ्या या गाडीच्या चेअर कारचं तिकीट 690 रुपये असेल, तर एक्झिक्युटिव्ह क्लासमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला 1,365 रुपये मोजावे लागणार आहेत.