गोरखपूर : गोरखपूरमध्ये ईदच्या निमित्तानं मोठ्या उत्साहात जुलूस काढण्यात आला. विद्यूत रोषणाई, फुगे, हिरवे झेंडे यांच्याबरोबरच तरुणांनी फडकवलेला तिरंगा झेंडा या जुलूसचं मुख्य आकर्षण ठरलं.


गोरखपूर शहराच्या वेगवेगळ्या भागातून निघालेल्या या जुलूसचं स्वागत करण्यासाठी हिंदू नागरिकही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. या जुलूसमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आसपासच्या भागात 12 सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. याबरोबरच दोन ऍडिशनल एसपी आणि सहा सीओंनाही तैनात करण्यात आलं होतं. या जुलूसनिमित्त गोरखपूर शहराला 5 झोन आणि 13 सेक्टरमध्ये वाटण्यात आलं होतं.