देहरादून : केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि आदता उत्तराखंडात त्रिवेंद्रांचा उदय झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपला बहुमत मिळालेल्या उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची माळ त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या गळ्यात पडलीय. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सर्व आमदारांनी त्रिवेंद्रसिंह रावत यांनी गटनेतेपदी निवड केली. 


58 वर्षीय त्रिवेंद्रसिंह रावत हे 2002 पासून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. रावत उद्या उत्तराखंडचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.


या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार उद्याच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ठरवण्यात येणार आहे. 


उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी 19 मार्चला होणार आहे.