अहमदाबाद : शाळेच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी गुजरातचे आरोग्य राज्यमंत्री शंकरभाई चौधरी शाळेत गेले. मंत्रीसाहेबांनी मुलांना अर्धातास इंग्रजी शिकवलं, मंत्र्यांनी यावेळेस मुलांना हत्ती म्हणजेच ELEPHANT चं स्पेलिंग कसं लिहाचं ते शिकवलं, पण मंत्र्यांनी हे स्पेलिंग फळ्यावर लिहलं तेव्हा त्यात चूक झाली आणि हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.


यावर एका न्यूज चॅनेलने मंत्री साहेबांकडे विचारणा केल्यावर, शंकरभाई चौधरी म्हणाले, मी अर्धा तास मुलांबरोबर होतो, हे न दाखवता आपण हे का दाखवताय, हे स्पेलिंग मी समजून उमजून चुकीचं लिहिलं होतं, ज्यामुळे मुलांना चूक ओळखता येईल आणि बरोबर काय ते सांगता येईल, यासाठी आपण असं लिहिल्याचं त्यांनी म्हटलंय.