तामिळनाडू : नव्या कोऱ्या २००० रुपयांच्या नोटा नागरिकांच्या हाती पडण्याआधीच एका गाडीतून जप्त करण्यात आल्यानं गुरुवारी एकच खळबळ उडाली होती. पण, या घटनेमागचं सत्य आता समोर येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तंजावूरमध्ये काल दोन हजार रुपयांच्या जवळपास ३६ हजार नव्या नोटा सापडल्या होत्या. मिळालेल्या गुप्त माहितीनंतर, निवडणूक अधिकाऱ्यांनी जवळपास ७ करोड ८५ लाख रुपये जप्त केले होते.


तंजावूरमध्ये विधानसभा निवडणूक...


एका गाडीमध्ये दोन हजार रुपयांचे बंडल सापडल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला होता. शिवाय, चौकशीदरम्यान गाडीचे कागदपत्रंही कॅश व्हॅन कागदांशी मेळ खात नव्हते... त्यामुळेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचा संशय बळावला. १९ नोव्हेंबर रोजी तंजावूरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत.


दोन हजारांच्या कोऱ्या नोटांचं सत्य...


मात्र चौकशी दरम्यान हे पैसे 'बँक ऑफ बडोदा'चे असून एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी हे पैसे जात असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर हे पैसे सरकारी खजान्यात जमा करण्यात आले. या पैशांचं निवडणूक आणि भ्रष्टाचाराशी संबंध नसल्याचं स्पष्ट झाल्यानं अधिकाऱ्यांचाही जीव भांड्यात पडला.