नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने आपले नवीन व्हर्जन ‘ट्विटर लाईट’ भारतात लाँच केले आहे. वोडाफोन ट्विटरच्या या नवीन व्हर्जनचा ग्लोबल पार्टनर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटर लाईटसाठी खूपच कमी मोबाईल डाटा लागणार आहे. हे व्हर्जन आधीच्या व्हर्जनपेक्षा ३० टक्क्यांनी अधिक जलद काम करणार आहे. तसेच त्यामध्ये ७० टक्केपेक्षा कमी डाटा खर्च होणार आहे. एक एमबीपेक्षाही कमी डेटाचे हे व्हर्जन आहे.


ट्विटरचे हे नवीव व्हर्जन ट्विटरच्या जुन्या यूजर्सना चांगला अनुभव देईल. तसेच भारतातील लहान - मोठ्या सर्वच शहरांमधील लोकं ट्विटरशी जोडले जातील. त्यातून त्यांना जगातील सर्व कानाकोपऱ्यातील माहिती मिळविण्यास मदत होईल. असे ट्विटरच्या मॅनेजिग डायरेक्टर माया हरी यांचे म्हणणे आहे.


तसेच आता सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांविषयी अर्लट न्यूज ट्विटर लाईट त्यांच्या युजर्सला देणार आहे. ट्विटरच्या यूजर्ससाठी आणखी एक खूशखबर आहे. तूमच्या मोबाईलचे नेटवर्क नसेल तर ऑफलाईनही हे व्हर्जन तूम्ही वापरु शकता. असा कंपनीचा दावा आहे.