कारमध्ये अडकून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये कारमध्ये अडकून दोन लहानग्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. या घटनेत आणखी एक चिमुकल्यावर उपचार सुरु असून त्याची स्थिती गंभीर आहे.
मुरादाबाद : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये कारमध्ये अडकून दोन लहानग्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. या घटनेत आणखी एक चिमुकल्यावर उपचार सुरु असून त्याची स्थिती गंभीर आहे.
खेळता खेळता चार लहान मुले घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीत घुसली आणि गाडीचा दरवाजा बंद केला. मात्र थोड्यावेळाने त्यांना तो उघडता येईना.
कारच्या खिडक्या काळ्या काचांच्या असल्याने बाहेरील कोणाचे लक्ष तेथे गेले नाही. मात्र जेव्हा या कारचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा दोन लहानग्यांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. एकावर उपचार सुरु असून त्याची स्थिती गंभीर असल्याचे समजतेय. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.