दोन नगरसेवकांमध्ये हाणामारी, चक्क शर्ट फाडला
आंध्र प्रदेशात तेलगु देसमच्या दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली.
हैदराबाद : आंध्र प्रदेशात तेलगु देसमच्या दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली.
गुंटुरमधील तेनाली महापालिकेत गुम्मादी रमेश आणि पासुपुलेती त्रिमुथुलु या दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. रमेश यांनी पासुपुलेती यांचा अक्षरश: शर्ट फाडला.
अखेर महिला नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर ही हाणामारी थांबली. महापालिकेच्या इतिवृत्तातील नोंदीबाबत दिशाभूल केली जात असल्याच्या संशयावरुन दोघांमध्ये वाद झाला.
अखेर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि महापालिकेतच हा मारहाणीचा लाजीरवाणा प्रकार घडला. या प्रकरमाची आपण गंभीर दखल घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री आणि तेलगु पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी दिलीय.