श्रीनगरमध्ये हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
उत्तर काश्मीरच्या बारामुलामध्ये शनिवारी एक मोठी दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. यावेळी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन प्रमुख दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलंय.
श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बारामुलामध्ये शनिवारी एक मोठी दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. यावेळी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन प्रमुख दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोपोरच्या अमरगड गावात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पोलीस अधीक्षक शफाकत हुसैन आणि उपनिरीक्षक मोहम्मद मुर्तजा हेदेखील जखमी झालेत.
दोन दहशतवादी एका गाडीतून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दहशतवाद्यांना रोखण्याच्या प्रयत्नात असताना चकमक सुरू झाली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हातबॉम्ब फेकला... यामध्ये काही पोलीस जखमी झाले. उत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून एक एके 47, एक पिस्तूल, चार हातबॉम्ब आणि दारुगोळा जप्त करण्यात आलं.