बिहार, झारखंडमध्ये दोन पत्रकारांची हत्या
बिहार आणि झारखंडमध्ये २४ तासांच्या आत दोन पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.
पाटणा, रांची : बिहार आणि झारखंडमध्ये २४ तासांच्या आत दोन पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.
बिहारच्या सिवानमध्ये हिन्दुस्तान या हिंदी दैनिकाचे ब्युरो चीफ राजदेव रंजन यांची हत्या केली. रेल्वे स्टेशनजवळ गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आलीय. रंजन यांच्या डोकं आणि मानेवर गोळ्या झाडण्यात आल्या. रंजन गेल्या २५ वर्षांपासून सिवानमधल्या गुन्हेगार आणि गुंडांविरोधातल्या बातम्या करत होते.
तर दुसरीकडे झारखंडच्या चतरा जिल्ह्याच्या देवरियामध्येही पत्रकाराची हत्या केलीय. एका न्यूज चॅनेलचे पत्रकार अखिलेश प्रताप सिंग यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ३५ वर्षीय अखिलेशची गुरूवारी रात्री हत्या करण्यात आली.