POK हल्ल्याबाबत अभिनंदन, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन
भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला
मुंबई : भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे. या कारवाईबद्दल उद्धव ठाकरेंनी मोदींचं अभिनंदन केलं आहे. मोदींचं अभिनंदन करताना उद्धव ठाकरेंनी भारतीय लष्कराचंही कौतुक केलं.