वाराणसी : गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवसेना आणि भाजपमध्ये रोज वाद होत असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट मोदींनाच आवाहन द्यायच्या तयारीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये जाणार आहेत. उत्तर प्रदेश निवडणुका लढवण्याचे संकेत शिवसेनेनं आधीच दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा वाराणसी दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.


गंगा आरती करण्यासाठी उद्धव ठाकरे वाराणसीला जाणार आहेत, पण याची तारीख ठरलेली नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशातल्या 403 पैकी 200 जागा लढवण्याचा शिवसेना विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.