व्हिडिओ : ५०० रुपयांच्या नोटांखाली गायकाला अक्षरश: गाडलं!
एखाद्या कलेची किंमत पैशांत मोजताना तुम्ही कधी पाहिलाय का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा... तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
अहमदाबाद : एखाद्या कलेची किंमत पैशांत मोजताना तुम्ही कधी पाहिलाय का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा... तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
गुजराती गायक किर्तीदान गढवी याला स्टेजवरच अक्षरश: पैशांमध्ये गाडलेलं या व्हिडिओत दिसतंय. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालेला दिसतोय.
२०१५ साली गुजरातच्या जामनगरमध्ये निघालेल्या गोरक्षा रॅलीत किर्तीदान पहिल्यांदा लोकांच्या नजरेत भरला होता. यावेळी त्यानं ४.५ करोड रुपये जमवले होते.