COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : क्रुड ऑईल म्हणजेच कच्च्या तेलाचे भाव कमी झाले, तर पेट्रोलचे भाव उतरतात, (अधिक ठळकपणे समजण्यासाठी वरील व्हिडीओत पाहा)  मात्र ११.२१ रूपये प्रति लीटर कच्च तेल, तुमच्या गाडीच्या पेट्रोल टाकीपर्यंत येतं तेव्हा, तुम्हाला ६० रूपये मोजावे लागतात.


कारण कच्च्या तेलाची किंमत प्रति लीटर समजा ११.२१ असेल, तर समुद्रातील वाहतूक आणि रिफायनरीमधून आल्यानंतर त्याची किंमत लीटरमागे ८.५० रूपयांनी वाढते. म्हणजेच ११.२१ लीटरवरून पेट्रोलची किंमत १९ रूपये ७० पैसे होते.


डिलर्सला पेट्रोल २३.४७ प्रति लीटरने दिले जाते. यावर २१.४८ रूपये एक्साईज ड्युटी लावली जाते, यानंतर डिलरला लीटरमागे २.५५ पैसे कमिशन दिलं जातं, यानंतर आणखी व्हॅट त्यात लावला जातो, १२.७४ रूपये (दिल्लीनुसार २७ टक्के), आणि साडे अकरा रूपये लीटरचं क्रुड ऑईल, यानंतर २० रूपये लीटरच पेट्रोल तुमच्यापर्यंत पोहोचतं तेव्हा ते प्रति लीटर ६० रूपये होतं. (हे टॅक्सेस दिल्लीतील आहेत, फेब्रुवारी २०१६च्या भावानुसार)