`आयसिस`चा सदस्य होण्यास नकार दिल्याने चिमुरड्याची हत्या?
अलाहाबाद : एका ११ वर्षीय मुलाने दहशतवादी होण्यास नकार दिल्याने त्याच्या ट्युशनच्या शिक्षकाने त्याची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.
अलाहाबाद : एका ११ वर्षीय मुलाने दहशतवादी होण्यास नकार दिल्याने त्याच्या ट्युशनच्या शिक्षकाने त्याची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.
ही घटना १९ मार्च रोजी घडली. रवी पाल हा तिसरीत शिकत होता. अलाहबादमधील कसेरुआ खुर्द गावात त्याचा मृतदेह सापडला. त्याची गळा दाबून हत्या केल्याचा संशय आहे.
मृत रवीच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार, त्याचा शिक्षक इरफान रवीवर आयसिस या दहशतवादी संघटनेचा सदस्य होण्यासाठी दबाव टाकत होता. जेव्हा रवीने त्यासाठी नकार दिला तेव्हा इरफानने त्याचा खून केला.
तर रवीच्या बहिणीने केलेल्या आरोपांनुसार इरफानने १९ मार्चला रवीला सायकल घेऊन देण्याचे आमीष दाखवले होते. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत रवी घरी परतला नसल्याने त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलीस निरीक्षक राजेश कुमार यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रवीच्या कुटुंबीयांनी १९ मार्चला रवी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी रवीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण, कुटुंबाने केलेले दावे मात्र पोलिसांनी फेटाळले आहेत.
मंगळवारी, पोलिसांना एका शेतात रवीचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.