पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले
उत्तर प्रदेशची राजधानीत नरही परिसरात पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले.
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानीत नरही परिसरात पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपले.
सानिया (बदललेले नाव) या महिलेचा फिरोज या युवकाशी प्रेम विवाह झाला होता. लग्नाला १३ वर्षे झालीत. या दोघांना १२ वर्षांची एक मुलगीही आहे. मात्र, फिरोजचे साधना (बदललेले नाव) या तरुणीबरोबर सूत जुळले. तो त्याच्यासोबरत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागला. सानियाने आरोप केलाय की, माझ्या संसारात या तरुणीने विष पेरलेय.
सानियाने याबाबत पोलिसात तक्रार केली. मात्र, तिला न्याय न मिळाल्याने तिन पतीसमोर या तरुणींला चांगलेच झोडपून काढले. पतीच्या प्रेमिकेची धुलाई भररस्त्यात सुरु असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.