लखनऊ :  उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एक हाय प्रोफाइल फॅमिलीत धक्कादायक तथ्य समोर आले आहे. यात सुनेने आपल्या सासऱ्यावर खासगी आयुष्य भंग केल्याचा आरोप केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सासऱ्याने जबरदस्ती तिच्या बेडरूम आणि बाथरूमवर नजर ठेवण्यासाठी घरात तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावले. सासरा या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुनेच्या बेडरूम आणि बाथरूमध्ये डोकावत होता. 


बरेलीच्या कॉलेजमध्ये लेक्चर आहे सून 


एसएसपी कार्यालयात तक्रार करणारी ही महिला बरेलीच्या एका मॅनेजमेंट कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करते. तिचा पतीही एका खासगी विद्यापीठात लेक्चरर आहे. दोघांचा २००६ मध्ये विवाह झाला होता. पतीचे विवाह बाह्य संबंधामुळे त्याचा पाच वर्षापासून घटस्फोटाचा खटला सुरू आहे. 


महिलेला घरातून बाहेर काढण्यासाठी कट 


खटला कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे. महिला अजूनही त्याच घरात राहत आहे, तिला घराबाहेर काढण्यासाठी हा कट रचण्यात आला. नायजेरियात एका प्रोजेक्ट मॅनेजर पदावर नोकरी करणारा सासरा गेल्या महिन्यात भारतात आला आणि मुलासह महिलेला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागला. 


खासगी आयुष्य धोक्यात 


महिलेच्या सासऱ्याने अशा प्रकारे सीसीटीव्ही लावले की त्यामुळे तिच्या खासगी आयुष्यावर नजर ठेवली जाईल. एक कॅमेरा बेडरूम आणि एक कॅमेरा बाथरूमजवळ लावला.  आपले खासगी आयुष्य रेकॉर्ड होण्याची तिला भीती आहे. त्यामुळे तिने तक्रार दाखल केली आहे. आरोपी कॅमरा हटविण्यास नकार देत आहेत.