नवी दिल्ली : UIDAI ने नागरिकांना AADHAR मध्ये आपला मोबाईल नंबर अपडेट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्यामुळे विविध सरकारी सेवांपर्यंत ऑनलाईन पोहोचता यावे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी माहिती दिली आहे की, नागरिक आधार नंबरच्या माध्यमातून विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ घेऊ शकता.
आधारकार्डवर आधारित वन टाईम पासवर्ड (OTP) हा लोकांची ओळख पटवण्यासाठी आणि ऑनलाईन सेवांचा लाभघेण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे मोबाईल नंबर अपडेट करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


अनेक सरकारी कामं आता आधारच्या माध्यमातून करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात आधार कार्ड अपडेट असणं फार महत्त्वाचं असणार आहे.