रामराजे शिंदे, झी मीडिया, मुंबई : केंद्र सरकार दिव्यांगांसाठी सोयीसुविधा पुरवत असल्याच्या जाहिराती करत असलं, तरी UPSC उत्तीर्ण झालेल्या अंध मुलीबाबत मात्र दुजाभाव असल्याचं स्पष्ट झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर रहिवासी असलेली प्रांजल पाटील यांच्याबाबत हा प्रकार घडलाय. त्यांना रेल्वेमध्ये पोस्टिंग मिळालं होतं. मात्र पीएचडी करत असल्यामुळे त्यांनी रुजू होण्यासाठी थोडी मुदत मागितली. त्यानंतर १५ डिसेंबरपासून रेल्वे सेवा प्रशिक्षणही सुरू झालं. मात्र प्रांजल यांना अपॉइंटमेंट लेटर मिळालं नाही... 


याबाबत DOAPपासून रेल्वे मंत्रालयापर्यंत त्यांनी अनेक चकरा मारल्या. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्र्यांना ट्वीट करून आपली व्यथा मांडलीये...


प्रांजल यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी...