उरी हशतवादी हल्ला : सुरक्षा यंत्रणांना फितुरीचा संशय
उरी हल्ल्यासंदर्भात दहशतवाद्यांच्या कटाला यश मिळण्यामागे फितुरीचा संशय व्यक्त होतोय.
नवी दिल्ली : उरी हल्ल्यासंदर्भात दहशतवाद्यांच्या कटाला यश मिळण्यामागे फितुरीचा संशय व्यक्त होतोय.
लष्कराच्या तपास यंत्रणा त्या संदर्भात आणखी तपास करत आहेत. उरीच्या लष्करी छावणीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झालेत. पण हल्ला ज्या प्रकारे करण्यात आला, त्यावरून हल्लोखोरांना लष्करी छावणी संदर्भातली संपूर्ण माहिती होती, असं दिसून येतंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांना ब्रिगेड कमांडरच्या निवासस्थानाची माहिती होती.
राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीनं यासंदर्भात केलेल्या तपासात दहशतवादी हल्ल्याच्या आदल्या दिवशीच भारतात घुसले.
दिवसभर त्यांनी डोंगरवरून छावणीतल्या हालचालींवर नजर ठेवली आणि पहाटेच्या सुमारास हल्ला चढवला.