उत्तराखंडसह उत्तरेत पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत
उत्तराखंडसह उत्तरेकडील बहुतांश भागात पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या ४८ तासांत या भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नवी दिल्ली : उत्तराखंडसह उत्तरेकडील बहुतांश भागात पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या ४८ तासांत या भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्यात. गंगोत्री-यमुनोत्री महामार्ग भूस्खलनामुळं बंद झाला आहे. हरिद्वारमध्येही मुसळधार पावसामुळं अनेक भागात पाणी साचलंय.. पिथौरागडमध्ये या पावसामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर कनखलजवळ बैरागी कॅम्पला जोडणारा पूल वाहून गेला आहे.
या पावसामुळं सर्वच नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. गंगा नदीसह अलकनंदा, भागिरथी, मंदाकिनी नदी किनारी राहणा-या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत रुडकी आणि हरिद्वारमध्ये सर्वाधिक ३१८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.