नवी दिल्ली : ऱामायणात लक्ष्मणाचा जीव वाचविण्यासाठी वापरण्यात आलेली संजीवनी बूटीचा शोध घेण्याचे उत्तराखंड सरकारने ठरविलेय. यासाठी सरकार तब्बल २५ कोटींचा खर्च करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामायणात रावणाविरोधात युद्ध करत असताना लक्ष्मण बेशुद्ध होऊन पडला होता. तेव्हा त्याच्या उपचारासाठी वैद्यांनी हनुमानाला द्रोणगिरी पर्वतावरुन संजीवनी बूटी हे औषध आणण्यास सांगितले होते. मात्र नेमके वनस्पती न समजल्याने हनुमानाने संपूर्ण द्रोणगिरी पर्वत उचलून आणला होता अशी कथा रामायणात सांगितली आहे. 


हिमालयातील या वनस्पतीचा शोध घेण्यासाठी उत्तराखंड सरकारने नवी समिती नेमलीये. यासाठी २५ कोटी खर्च केला जाणार आहे. तसेच या समितीतील अधिकाऱ्यांना द्रोणगिरी पर्वतावर जाण्याचे आदेश दिलेत. पुढील महिन्यांपासून ही समिती काम सुरु करणार आहे.