मुजफ्फरनगर : मांसहारी जेवण नसल्यामुळे मंडपामध्ये लग्नाला केलेला विरोध नवरदेवाला चांगलाच महागात पडला आहे. शाकाहारी जेवणाला विरोध करणाऱ्या वराला डावलून वधूनं मंडपातल्या दुसऱ्याच मुलाशी लग्न केल्याचा प्रकार मुजफ्फरनगरमध्ये घडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न मंडपामध्ये मांसहारी जेवण नसल्यामुळे मुलाकडच्यांनी गोंधळ घातला आणि वराला लग्नाला उभं करण्यास नकार दिला. यावेळी मंडपामध्येच असलेल्या एका मुलानं वधूला प्रपोज केलं आणि मुलीनंही याला होकार दिल्यामुळे दोघं बोहल्यावर चढले. मुजफ्फरनगरमधल्या कुल्हेडी गावामध्ये हा प्रकार घडला आहे. वरानं लग्नाला नकार दिल्यावर ग्रामस्थांनी त्याला समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.


उत्तर प्रदेशमध्ये कत्तलखान्यांवर सुरु असलेल्या कारवाईमुळे मांसाचा पुरवठा कमी प्रमाणावर होत आहे. याचबरोबर मांसाचे भावही गगनाला भिडले आहेत. यामुळे या लग्नात फक्त शाकाहारी जेवणचं ठेवण्यात आलं होतं.