माल्ल्यांनी तिसऱ्यांदा काढली पळवाट... बँकांची चिंता वाढली!
विजय मल्ल्यांनी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) न्यायालयासमोर हजर रहाण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत मागितली आहे.
मुंबई : विजय मल्ल्यांनी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) न्यायालयासमोर हजर रहाण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत मागितली आहे.
काही दिवसांपूर्वीच विजय मल्या यांना ईडीनं तीसरं समन्स पाठवून हजर रहाण्यास सांगितलं होतं. मात्र, माल्यांनी ईडीकडे मे महिन्यातील तारीख मागितलीय. ईडीनं पाठवलेल्या तिसऱ्या समन्सनंतरही माल्यांनी उपस्थिती टाळल्यानं आता ईडीसमोर प्रकरण न्यायालयात नेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
माल्या यांनी पत्नी आणि मुलांच्या नावावर असलेली सर्व वैयक्तिक संपत्ती जाहीर करावी आणि बँकांसमोर पुढील दोन आठवड्यात कर्जफेडीचा पस्ताव सादर करावा, असे आदेश गुरुवारी सुप्रीम कोर्टानं दिलेत.
माल्या यांनी बँकांसमोर चार हजार कोटी रुपयांच्या कर्ज फेडीबाबतचा प्रस्ताव बँकांनी नाकारलाय. त्यांनी स्वत: येऊन बँकाशी चर्चा करावी, अशी मागणी बँकांनी केलीय. आपली विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी माल्यांनी न्यायालयाकडे ठराविक रक्कम जमा करावी, अशी मागणी बँकांनी केलीय.