मुंबई: देशातल्या बँकांचं कर्ज बुडवून विजय माल्ल्या ब्रिटनला गेल्यानं त्यांच्या सर्व बाजूंनी टीका होत आहे. असं असतानाच या सगळ्या वादावर माल्ल्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला भारतामध्ये परतायचं आहे, पण आत्ताची वेळ योग्य नसल्याचं माल्ल्या म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला भारतामध्ये परतायचं आहे, पण माझी बाजू मांडण्याची संधी मला मिळेल का याबाबत साशंकता आहे. मला आधीच गुन्हेगार ठरवलं जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. 


ब्रिटनमधलं वृत्तपत्र संडे गार्डियनला ई-मेलवर माल्ल्यांनी मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांच्या वास्तव्याबाबतही विचारण्यात आलं, पण त्यांनी याबाबत मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 


17 बँकांकडून विजय माल्ल्यांनी 9 हजार कोटींचं कर्ज घेतलं, हे कर्ज त्यांना फेडता आलं नाही, पण याचा दोष त्यांनी या बँकांनाच दिला आहे. बँका कर्ज देताना पूर्णपणे विचार करतात. माझा व्यवसाय चांगला सुरु असतानाच जागतिक मंदी आली, ज्याचा फटका बसला असंही माल्ल्या म्हणाले आहेत.