धक्कादायक! गावकऱ्यांनी ५० कुत्र्यांना जाळलं
चेन्नईपासून ५० किलोमीटर अंतरावरील किझापूर या गावतील लोकांनी ५० कुत्र्यांना जिवंत जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडलीये. गावकऱ्यांच्या मेंढ्या आणि बकऱ्यांवर हल्ल्या केल्यामुळे कुत्र्यांना जाळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही भयानक घटना ५ जूनला घडल्याचे समोर आले आहे. जाळण्याअगोदर या कुत्र्यांना किटकनाशक देऊन मारण्यात आले, त्यानंतर त्यांना जाळण्यात आले.
चेन्नई : चेन्नईपासून ५० किलोमीटर अंतरावरील किझापूर या गावतील लोकांनी ५० कुत्र्यांना जिवंत जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडलीये. गावकऱ्यांच्या मेंढ्या आणि बकऱ्यांवर हल्ल्या केल्यामुळे कुत्र्यांना जाळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही भयानक घटना ५ जूनला घडल्याचे समोर आले आहे. जाळण्याअगोदर या कुत्र्यांना किटकनाशक देऊन मारण्यात आले, त्यानंतर त्यांना जाळण्यात आले.
एका गावकऱ्याने सांगितल्यानंतर प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणारे पी. आश्वत यांनी ही दु:खद घटना समोर आणली. पुढे आश्वत यांनी पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी चार गावकऱ्यांना अटक केली आहे.