नवी दिल्ली :  भारताने पहिल्यादांना एलओसी पार करून पाक व्याप्त काश्मीरात ३ किलोमीटर आत जाऊन ७ दहशतवादी कॅम्प नेस्तानाबूद केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने याला सर्जिकल स्ट्राइक मानत नाही या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात येईल अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे. पण या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी भारताने आपली संपूर्ण तयारी केली आहे. 


पंजाबच्या सीमावर्ती भागातील १० किलोमीटरच्या आत असलेले गाव रिकामे करण्यात आले. भारतीय लष्कराने एलओसी पार जाऊन सर्जिकल स्टाइक केल्यानंतर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने आंतरराष्ट्रीय बॉर्डरवर बंदोबस्त वाढविला आहे. 


एएनआयने दिलेल्या माहितीनुसार वाघा बॉर्डरवरील आज संध्याकाळी होणारी बिटिंग रिट्रीट सेरेमनी रद्द केली आहे. 


सीमावर्ती भाग असलेल्या पंजाबच्या जिल्हा प्रशासनाने १० किलोमीटर आतील गाव रिकामे केले आहेत. तसेच गावातील सरपंच आणि स्थानिक अधिकाऱ्यांना यांच्या सूचना केल्या आहेत. 


पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी चंदीगड येथे आमदार आणि मंत्र्यांची बैठख बोलावली आहे.