मुंबई: उत्तराखंड पोलिसांचा घोडा शक्तीमान याचा मृत्यू झाल्यानंतर क्रिकेटर विराट कोहलीनं ट्विटरवर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. शक्तीमान आम्ही माणसं अपयशी ठरलो, असं ट्विट विराट कोहलीनं केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



उत्तराखंडचे भाजप आमदार गणेश जोशी यांनी मागच्या महिन्यात शक्तीमानवर हल्ला केला असा आरोप होत आहे. या हल्ल्यानंतर शक्तीमानचा डावा पाय कापावा लागला आणि त्याला कृत्रिम पाय लावला गेला. पण उपचारांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शक्तीमानचा मृत्यू झाला. 


शक्तीमान हा शहीद झाला, तो आमच्यासाठी जवान होता, अशी प्रतिक्रिया उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी दिली आहे. तर या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, एका पोलीस अधिकाऱ्याला मारल्याच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे, असं मनेका गांधी म्हणाल्या आहेत. 


तर यामध्ये माझा काहीच दोष नसल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार गणेश जोशी यांनी दिली आहे. मी जर दोषी असेन तर माझाही पाय कापा असं जोशी आधी म्हणाले होते. शक्तीमानच्या मृत्यूला राज्य सरकार जबाबदार आहे, त्याला योग्य उपचार मिळाले नाहीत, असा आरोप उत्तराखंडचे भाजप आमदार अजय भट यांनी केला आहे.