नवी दिल्ली : मतदान ID, पॅन कार्ड, आधार कार्ड काढणे अधिक सोपे झाले आहे, ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नवीन आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आता शासकीय कार्यालयात किंवा तहसील, जिल्हा मुख्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. एकाच छताखाली तीन महत्वाची ओळखपत्रे मिळणार आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड ही महत्वाची ओळखपत्रे आहेत. प्रत्येक कामाच्या ठिकाणी यापैकी कोणतेना कोणते एक गरजेचे असते. त्यामुळे ज्यांच्याकडे ही ओळखपत्रे नाहीत, त्यांच्या कामाचा खोळंबा होतो. आता सहज ही ओळखपत्रे मिळणार आहेत. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि कामाचा खोळंबा होणार नाही. तुमच्या आजुबाजूला किंवा शहराच्या मध्यभागी यासाठी ही सेंटर असणार आहेत.


ही नवीन सुविधा एका कॉमन सर्व्हीस सेंटरच्या माध्यमातून मिळणार आहे. मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्ही स्वत: काढू शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हीस सेंटरमध्ये जावे लागेल. रंगीत मतदान काढण्यासाठी तुम्हाला काही शुल्क मोजावे लागेल. प्रत्येक अर्जप्रमाणे तुम्हाला पैसे द्यावे लागतील. पॅन कार्डसाठी तुम्हाला 107 रुपये आणि वेगळे काही कमिशन द्यावे लागेल.


कॉमन सर्व्हीस सेंटरमध्ये मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. तुम्हाला 20 ते 30 रुपये खर्च करुन आधार कार्डची प्रिंट आऊट घेऊ शकता. तसेच रंगीत मतदान कार्डही बनवू शकता. मात्र, कोणतीही सुविधा मोफत नसणार नाही. प्रत्येक सुविधेसाठी तुम्हाला अर्जानुसार पैसे मोजावे लागतील.


कोणताही पासपोर्ट बनवायचा असेल तर सीएसएसवर जाऊन अप्लाय करु शकता. जे शुल्क असेल ते भरावे लागेल. नेट बॅंकिंगद्वारे , डेबिट किंवा क्रेडीट कार्डने चलन भरु शकता. सीएसएस पासपोर्ट सेवा केंद्रावर व्यक्तीला अपॉईंटमेंटही मिळू शकते. या सर्व सुविधांसाठी तुम्हाला 100 रुपये शुल्क द्यावे लागेल.