चेन्नई : दक्षिणेतली दोन महत्वाची राज्ये अर्थात तामिळनाडू आणि केरळमध्ये आज मतदान होतंय. एकाच टप्प्यात होणाऱ्या या मतदानातून तामिळनाडूत विद्यमान मुख्यमंत्री अण्णा द्रमुक पक्षाच्या जयललिता आणि केरळमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांचं भवितव्य ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडूत जयललितांसमोर द्रमुक पक्षाचे एम करुणानिधी यांचं आव्हान आहे. तर केरळमध्ये चंडी यांच्या समोर डाव्या आघाडीचे व्ही एस अच्युतानंदन यांच्यांत लढाई रंगणार आहे. 


दोन्ही राज्यांमध्ये आपला जनाधार वाढवण्यासाठी भाजपनंही जोरदार ताकद लावलीय. सोबतच पाँडिचेरीमध्येही आज मतदान होतंय. या सगळ्या जागांसाठी 19 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासोबतच आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही झालेल्या मतदानाचा निकाल 19 तारखेला लागणार आहे.