पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात
पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी अखेरच्या आणि सहाव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालीय. सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार मतदान केंद्रावर पोहचू लागलेत.. सकाळी ९ वाजेपर्यंत २३.४६ टक्के इतकं मतदान झालंय.
कोलकाता : पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी अखेरच्या आणि सहाव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालीय. सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार मतदान केंद्रावर पोहचू लागलेत.. सकाळी ९ वाजेपर्यंत २३.४६ टक्के इतकं मतदान झालंय.
खेरच्या टप्प्यात दोन जिल्ह्यातील २५ जागांसाठी मतदान होतंय.. जवळपास ५८ लाख मतदार ६ हजार ७७४ मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.. अखेरच्या टप्प्यात १७० उमेदवारांचं भवितव्य व्होटिंग मशिनमध्ये बंद होईल.. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय.
अखेरच्या टप्प्यात सा-यांच्या नजरा नंदीग्राममधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यावर असतील.. याच ठिकाणी भूमीअधिग्रहण विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर 34 वर्षाची डाव्यांची सत्ता उलथवून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०११ साली इथं तृणमूल काँग्रेसनं सर्व ११ जागा जिंकल्या होत्या.