पटना : उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरप्रदेशातील विजयावर अनेकांच्या भूवया उंचावल्या. पण याचा प्रभाव बिहारमध्ये देखील दिसू लागला आहे. बिहारमध्ये यावरुन आता वॉर सुरू झाला आहे. बिहारमध्ये यूपीतल्या विजयानंतर या दोन नेत्यामध्ये युद्ध रंगू लागलं आहे. आरजेडीचे अध्यक्ष लालू यादव आणि भाजपचे नेता सुशील मोदी यांच्यात वॉर सुरु झाला आहे. सुशील मोदींच्या ट्विटवर लालू यादव यांनी त्यांच्या अंदाजात उत्तर दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशील मोदींनी ट्विट करत लालू यादव यांना टॅग केलं. आणि विचारलं की  ‘का हाल बा ?’यावर लालू यादव भडकले. लालू यादवांनी त्यांच्या अंदाजात उत्तर दिलं. लालू यादव यांनी ट्विट करत म्हटलं की,‘ठीक बा। बघ ना, भाजपने तुम्हाला यूपीत नाही घुसु दिलं आणि त्याच्या फायदा झाला.


यूपीमध्ये लालू यादव यांनी सपा-काँग्रेस आघाडीसाठी प्रचार केला होता. लालूंनी अखिलेशसाठी मतं मागितली होती आणि सपाच्या विजयाचा दावा केला होता. पण आता उत्तर प्रदेशातील विजयानंतर लालू यादव आणि सुशील मोदी यांच्यात वॉर रंगू लागला आहे.