मुंबई: फिरायला गेल्यावर फोटो काढा हा... असे आधी सांगितले जायचे पण आता मात्रा फोटा काढा आणि फेसबुकवर अपलोड करा हा असे ऐकायला मिळते.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी साध्या 'गेट टूगेदर', पिकनीकपासून लग्न समारंभापर्यंतचे सगळे फोटाज फेसबुकवर टाकण्याचं हल्ली फॅड आलयं. मात्र आता असे फोटोज फेसबुकवर टाकताना काळजी घ्या. कारण आता तुमच्या फेसबूक अकाउंटवर इन्कम टॅक्स अधिका-यांची नजर असू शकते.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार वाढत्या मंदीमुळे किंवा अन्य कारणांमुळे करदाते कर भरतांना आपले उत्पन्न लपवतात किंवा कमी दाखवतात. पण हेच करदाते आपल्या सहलींचे व पार्टीजचे फोटाज फेसबुकवर टाकतात आणि शेअर करतात. मात्र या शेअरिंगमुळे इन्कम टॅक्स करदात्यांचे खरे उत्पन्न अधिकाऱ्यांच्या नजरेस पडते.

मुंबई, दिल्ली यांसारख्या महानगरात राहणारे करदाते ह्याला बळी पडत नाहीत. मात्र निमशहरी भागातील करदात्यांच्या या हालचालींवर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून बारीक लक्ष ठेवले जाते. असेच पश्चिम बंगालमधील असनसोल येथे एका चार्टड अकाउंटटला त्याच्या परदेशीय सहलीवरून हा अनुभव आला. लोकांच्या खाजगी गोष्टींमध्ये मध्यस्ती करू नये पण फेसबूक पोस्टवरून याच करदात्यांचे खरे उत्पन्न उघडकीस आले.