नवी दिल्ली : 68व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीत पथसंचलनाची भव्यता साऱ्या जगाला पुन्हा एकदा बघायला मिळाली. अनेक वैशिष्टं असणाऱ्या या पथसंचलनात राष्ट्रीय सुरक्षा गार्डाचे जवान यंदा प्रथमच संचलनात सामील झाले. त्याचप्रमाणे यूएईच्या जवानांचं एक खास पथकही संचलनात समील झालं. नेहमी प्रमाणे विविधा राज्याच्या सांस्कृतिक इतिहासाची ओळख करून देणारे चित्ररथही होते. गेल्यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ या संचलनात नव्हता. पण यंदा लोकमान्य टिळकाचा 160 वी जयंती आहे. त्यानिमित्त स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं इंग्रजांना खडसावून सांगणाऱ्या टिळाकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा महाराष्ट्राचा चित्ररथ संचलनात समील झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्षद्विपचा चित्ररथ 25 वर्षानंतर संचलनात शामील झाला. तर राजधानी दिल्लीच्या चित्ररथालाही 3 वर्षांनतंर संचलनात स्थान मिळालं. यंदा लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा चित्ररथही राजपथावर होते. याशिवाय यंदा प्रथमच लष्कराची ताकद दाखण्यासाठी भीष्म, ब्राम्होस क्षेपणास्त्र, शस्त्रास्त्र टिपणारी स्वाती ही नवी रडार प्रणाली, आकाश रडार सिस्टिम, धनुष्य वेपन सिस्टम यासारखी अत्याधुनिक यंत्रणा जगासमोर आली. भारतीय नौदलाची कोलकाता डिस्ट्रोयर पाणबुडी, आणि कलावरी जातीच्या पाणबुड्याच्या प्रतिकृती राजपथावर उतरण्यात आले. याशिवाय वायसूनेची सुखोई 30, मिराज 2000 आणि तेजस ही भारतीय बनावटीचं लढाऊ विमानं संचलनाच्या शेवटच्या टप्प्यात आकशात  चित्तथरार कसरती केल्या.


पाहा संपूर्ण कार्यक्रम