नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत मंदीचे वातावरण आणि अलंकार, दागिणे बनविणाऱ्यांची मागणी तसेच स्थानिक ग्राहकांची मागणी कमी यामुळे दिल्लीत सरापा बाजारात सोनेच्या दरात थोडी घसरण पाहायला मिळाली. सोनेचा दर २९,८०० प्रति १० ग्रॅमला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रात उठाव होत नसल्याने चांदीच्या दरातही घरसण पाहायला मिळत आहे. चांदीचा किलो मागे ५५० रुपयांचा दर घसरला. ४०,३५०रुपये चांदीचा किलोचा दर होता. जागतिक बाजारातील मंदीचा फटका बसत आहे.


सिंगापूरमध्ये सोने दर ०.१७ टक्क्यांनी घसरुन १२४५.९० डॉलर प्रति औंस होता. तर दिल्लीत सोने ९९.९ आणि ९९.५ शुद्धतेचा भाव १०० रुपयांनी खाली आला. सोने २९,८०० आणि २९,६५० रुपये १० ग्रॅम बंद झाला. गुरुवारी सोनेच्या दर ४०० रुपयांनी वाढला होता. 


चांदीचा दर ५५० रुपयांनी घसरुन ४०,३५० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरी १,११५ रुपयांनी घसरली. ४०,१११ रुपये किलोला बंद झाला.