अक्षय तृतीयेला सोनं वाढणार का कमी होणार ?
अक्षय तृतीयेचा मुहुर्त हा सोने खरेदीसाठी चांगला मानला जातो.
मुंबई: अक्षय तृतीयेचा मुहुर्त हा सोने खरेदीसाठी चांगला मानला जातो. यंदा अक्षय तृतीया नऊ मे ला आहे. पण या मुहुर्तावर सोन्याच्या भावामध्ये फारसा फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय ज्वेलर्स व्यापर संघानं दिली आहे. सध्या सोन्याचे भाव 30 हजार रुपये तोळा एवढे आहेत.
दुष्काळाचा परिणाम सोने खरेदीवर ?
देशभरामध्ये पडलेल्या दुष्काळ आणि सोन्याचे चढे भाव यामुळे यंदा अक्षय तृतीयेला सोनं खरेदी कमी व्हायची शक्यताही व्यापारी संघानं व्यक्त केली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोन्याचा भाव 26,930 होता, पण सध्या हा भाव 30,050 रुपयांपर्यंत गेला आहे. सोन्याची खरेदी कमी होत असेल तर भाव दहा टक्क्यांनी कमी व्हायचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.