नवी दिल्ली : दिल्लीतील मेट्रो ही अचानक गायब झाल्याचं तुम्हाला कळलं तर...? तुम्ही ही विचार करायला लागला असाल ना... की एवढी मोठी ट्रेन गेली तरी कुठे. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना देखील हाच प्रश्न पडला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोएडा-द्वारका कॉरिडोरवर एक मेट्रो अचानक गायब झाली. ट्रॅकवरुन ही मेट्रो गेली कुठे याची चिंता अधिक होती कारण मेट्रो ही प्रवाशांनी भरलेली होती. हा तांत्रिक बिघाड जवळपास अर्धातास होता. मेट्रो नेमकी आहे कुठे हे कळणे कठिण झाले होते.


सर्किट ड्रॉप झाल्यास मेट्रोचं लोकेशन कळत नाही असं तांत्रिक कारण रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलं. सकाळी ८ ते ९.३० पर्यंत हा बिघाड दुरुस्त करण्यात वेळ लागला. त्यामुळे इतर गांड्यांवरही याचा परिणाम पाहायला मिळाला.