मुंबई : शनिवारी रात्री सुरीगावातील एका घरात अचानक बिबट्या शिरल्याने खळबळ माजली. कुटुंबातील व्यक्ती हे घरात टीव्ही बघत होते. त्यानंतर बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिबट्याच्या हल्ल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींनी आरडा-ओरड केली त्यानंतर गावातील लोक घराकडे धावून आले. बिबट्याच्या हल्ल्यात ३ जण गभीर जखमी झाले. तर बचाव करण्यासाठी गेलेल्या काही गावकऱ्यांनाही बिबट्याने जखमी केलं.


गाववाल्यांनी जागृकता दाखवत बिबट्याला एका खोलीत बंद केलं. ज्यामुळे अनेकांचे जीव वाचले. यानंतर गावातील लोकांनी वन विभागाच्या लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात बंद केलं.