चुरु : नोटबंदीनंतर काळा पैसा बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांच्याकडे त्यांच्याकडे असलेल्या पैशाचा पुरावा नाही ते पैसे असे टाकून देतांना दिसत आहेत.  राजस्थानमधील चुरुमध्ये सध्या एक अशीच घटना घडली आहे. जेव्हा एनएच-65 या कारच्या बोनेटमध्ये अचानक आग लागली तेव्हा त्या आगीवर पैसे बरसू लागले.


जळती गाडी पाहून त्याकडे लोकांनी धाव घेतली. लोकं येतांना पाहताच कारमधील लोकं तेथून फरार झाले. पोलिसांनी कार नंबरवरुन कार मालकाचा शोध घेणे सुरु केलं आहे. कार ही हरियाणाची असल्याची माहिती समोर येत आहे.