नवी दिल्ली : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गोरखपूरमधून ते भाजपचे खासदार देखील होते. योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यापासून ते खूपच चर्चेत आहेत आणि त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आता समोर येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०११ मध्ये योगी आदित्यनाथ यांना अलिगढमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दिल्लीमध्ये त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. २००६ मध्ये शहरामध्ये दंगल झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने त्यावेळी राजकीय नेत्यांना शहरात येण्यास नाकारलं होतं. पण त्यावेळेस देखील योगी आदित्यनाथ प्रशासनाला नकळत शहरात जाऊन पोहोचले आणि पत्रकारांशी बोलत असतांना प्रशासनाच्या ते लक्षात आलं. त्यानंतर शेकडो पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तेव्हा देखील ते खासदार होते.


पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना जिल्ह्याच्या बाहेर सोडलं. पण त्यानंतर दिल्लीमध्ये त्यांना २ दिवस एका खोलीत नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेस भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आणि इतर नेते सुद्धा २ दिवस नजरकैदेत होते. योगी आदित्यनाथ यांनी संसदेत सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता. बोलत असतांना त्यांना अश्रू अनावर झाले होते.