नवी दिल्ली : आज मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यामुळे अनेकांना आपल्याकडील नोटांची चिंता पडली आहे. मात्र, या ठिकाणी चालणार ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा पुढील तीन दिवस चालणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- सर्व प्रकारच्या सरकारी रुग्णालयांमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चालतील
- सरकारी रुग्णालयांमधील औषधांच्या दुकानांमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चालतील
- रेल्वेची तिकीटे काढण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या नोटा चालू शकतील
- राज्य सरकारच्या बस प्रवासाची तिकीटे काढण्यासाठी या नोटा चालतील.
- एअरपोर्टवर वापरण्यासाठी किंवा विमानाची तिकीटे काढण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चालतील
- पेट्रोल पंपावर आणि सीएनजी पंपांवर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चालतील
-  ही मुदत केवळ शुक्रवार, ११ नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंतच आहे. त्यानंतर वरील सर्व ठिकाणीही ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चालू शकणार नाहीत


या कालावधीत नोटा बदलू शकता?


तुमच्याकडे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असतील तरी तुम्ही घाबरुन जाऊ नका. तुम्ही या नोटा बदलू शकता. त्यासाठी काही कालावधी दिलेला आहे. त्याच कालावधीत बदला. नाहीतर तुम्हाला रिर्झव्ह बॅंकेत चकरा मारव्या लागतील.


- 10 ते 24 नोव्हेंबर 4 हजार रुपये बॅंकेतून किंवा एटीएममधून काढता येणार
- 15 दिवसांपासून याची मुदत वाढ
- 31 डिसेंबर 2016 पर्यंत नोटा बदलून मिळणार आहेत.
- 31 डिसेंबरनंतर थेट रिर्झव्ह बॅंकेत नोटा बदलाव्या लागतील.
 - उद्या बॅंका बंद, एटीएम  9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर या दोन दिवशी बंद राहणार
- बॅंक तसेच एटीएममधून प्रतिदिन 2000 रुपये काढू शकता.
- बॅंकेत पैसे जमा करताना तुमच्याकडे पॅन नंबर किंवा आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.
- 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 पर्यंत 4000 हजार पर्यंत तुम्ही बँकेतील खात्यात पैसे जमा करू शकतात. 
- तुम्ही 500 आणि 1000च्या नोटा तुमच्या खात्यात जमा करू शकणार आहेत. 
- 4000 हजार पर्यंत नोटा बदलत्या येणार आहे. 
- त्यानंतर 15 दिवसांनंतर आणखी एक संधी देण्यात येणार आहे. 
- पुढच्या 50 दिवसात बँका जमा कराव्या लागणार आहेत. 
- आता नवीन नोटा उपलब्ध होईपर्यंत खात्यातून दररोज 10 हजार आणि आठवड्यातून 20000 काढण्याची देण्यात आली आहे.