कोईम्बतूर: कावळा हा काळा असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण कावळा पांढरा असतो हे तुम्हाला सांगितल्यास कदाचित विश्वास बसणार नाही. असं असलं तरी कोईम्बतूरमध्ये चक्क पांढरा कावळा आढळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जखमी अवस्थेत हा पांढरा कावळा सापडला आहे. काही वन्यजीवप्रेमींच्या निदर्शनास हा जखमी पांढरा कावळा आला. या पांढ-या कावळ्याला जखमा झाल्या होत्या, त्यामुळे त्याला उडता येत नव्हतं. 


या वन्यजीवप्रेमींनी त्या पांढ-या कावळ्यावर उपचार केले. हा कावळा एल्बिनो नावाच्या आजारामुळं पांढरा झाल्याचं समोर आलं आहे. उपचारानंतर या पांढ-या कावळ्याला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आलं.