नवी दिल्ली : एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या वादग्रस्त विधानावरुन देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते श्याम प्रकाश द्विवेदी यांनी तर ओवेंसीची जीभ कापणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच ओवेसी हे देशद्रोही असून त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही असेही म्हटले आहे. 


ओवेसी देशद्रोही आहेत. भारत माता की जय म्हणण्यास विरोध करणाऱ्यांना माझ्या मते देशात राहण्याचा काहीएक अधिकार नाही. माझं हेच म्हणण आहे ज्या जीभेने तो हे वाक्य बोललाय ती जीभ कापणाऱ्याला मी एक कोटी रुपयांचे बक्षीस देईन,असे द्विवेदी म्हणाले.